नागराज मंजुळे दिग्दर्शित करणार ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग’चा प्रोमो

Zee Maharashtra Kusti League
Nagraj Manjule, ‘Zee Maharashtra Kusti League

झी टॉकीजच्या विद्यमाने महाराष्ट्रातील मातीतल्या या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी खास ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग‘चे आयोजन करण्यात आले आहे. या लीगचा थरार २ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर या कालवधीत पुण्याच्या बालेवाडीत रंगणार आहे. या बहुचर्चित ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग’ बरोबर सुरवातीपासूनच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज नावे जोडली जात आहेत .त्यातीलचं एक महत्वाचे नाव म्हणजे दिग्दर्शक नागराज मंजुळे.
पिस्तुल्या‘, ‘फँड्री‘ व ‘सैराट‘ यासारख्या चित्रपटातून आपले सामाजिक भान दाखवून देणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे आता झी टॉकीजसाठी ‘झी महाराष्ट्र कुस्तीलीग’चा प्रोमो दिग्दर्शित करणार आहेत आणि मुख्य म्हणजे यात ते अभिनय सुद्धा करणार आहेत.

पैलवानांनी शड्डू ठोकल्यापासून चितपट करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत वाढणारी ही उत्कंठा ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग‘मुळे आता साऱ्या महाराष्ट्राला लागून राहिली आहे. नागराज मंजुळे ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग’ चा हा थरार प्रोमोच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवणार आहेत. या प्रोमोबद्दल नागराज मंजुळे यांनी सांगितले की,” घरात बसून छोट्या पडद्यावर क्षणक्षणाला उत्कंठा वाढवणारा कुस्ती हा खेळ पाहण्याची मजा काही औरच असेल. ‘झी महाराष्ट्र कुस्तीलीग’शी संलग्न होऊन त्याचा प्रोमो दिग्दर्शित करताना मला खरंच खूप आनंद होत आहे. माझ्या कामावर आजवर प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केले आहे आणि त्यांना हा प्रोमोसुद्धा आवडेल अशी आशा व्यक्त करतो