Facebook Twitter

मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Wednesday, May 23, 2012
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld
 
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
 
सिनेवार्ता
'राजा शिवछत्रपती' चित्रपटाच्या माध्यमातून हिंदी आणि इंग्रजीतून बनवण्यासाठी नितीन देसाई सज्ज.
१२ जून २०१० © मराठीमुव्हीवर्ल्ड
'राजा शिवछत्रपती' या भव्य दिव्य मालिकेनंतर कलादिग्दर्शक नितीन देसाई आता हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये 'द ग्रेट वॉरिअर राजा शिवछत्रपती' नावाने चित्रपट निर्मितीसाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटाची निर्मितीमुल्य जपण्यासाठी नितीन देसाई बॉलिवुड आणि हॉलिवुडच्या उत्कृष्ट तंत्रज्ञांशी संपर्क साधत आहेत. ते गुलजार यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक असल्याने त्यांची लवकरच भेट घेतली. चित्रपटाबद्दल आणखी माहिती २४ जूनला कळेल.

सध्या देसाई आपल्या प्रसिद्ध मालिका 'राजा शिवछत्रपतीच्या' डीव्हीडी प्रदर्शनाच्या कामात व्यस्त असून ते आणखी एक भव्य ऐतिहासिक मालिका 'श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी' 'ई टिव्ही मराठी'वर १४ जून २०१० पासून घेऊन येत आहेत.  

चित्रपटावर प्रत्यक्षात काम करण्यापूर्वी संभाजी महाराजांच्या जीवनपट उलगणार्‍या मालिकेची निर्मिती करणार आहेत. ज्यात डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असून चित्रपटातली राजा शिवछत्रपतींची भूमिका सुद्धा तेच साकारताना दिसणार आहे.

चित्रपटाला जिवंतपणा यावा यासाठी नितीन देसाई यांनी काही महत्त्वाचे प्रसंग महाराष्ट्रातल्या प्रत्यक्ष किल्ल्यांवर चित्रीकरण करण्याचे ठरवले आहे त्यासाठी त्यांनी परवानगीसाठी अर्जसुद्धा केले आहेत. भव्य दिव्य देखाव्यांप्रमाणेच चित्रपटाचे बजेट सुद्धा भव्यच असणार यात शंका नाही.
'राजा शिवछत्रपती'



मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

-: A Project by :-
Honeybee Media
Honeybee Media Pvt. Ltd.