मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Saturday, May 25, 2013
मुख्य पृष्ठ - संपर्क
marathimovieworld
 
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
सिनेवार्ता
बळीराजाच्या प्रश्नांची उत्तरे शोधणारा 'जागरण'.
मंगळवार, २४ जुलै २०१२ | © मराठीमुव्हीवर्ल्ड

Jagran, Amol Kolhe
दुसर्‍यांना अन्नपुरवठा करणारा हा बळीराजा आज स्वतःच आत्महत्येच्या दुष्टचक्रात अडकलेला आहे. त्याच्या या परिस्थितीसाठी नेमकं कोण जबाबदार आहे ? हे संकट आस्मानी आहे की सुनामी? त्याच्या या प्रश्नांचा शोध घेणारा नव्हे तर त्या प्रश्नांची उत्तरे शोधणारा 'जागरण' हा चित्रपट तयार होत आहे.

'खेडयाकडे चला' असा संदेश देणार्‍या या चित्रपटाच्या निर्मितीचा संकल्प केला आहे निर्माते अरविंद तावरे यांनी. त्यांच्या 'मुक्ती व्हिज्युअल्स' या बॅनरखाली बनणार्‍या या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत समीर रावसाहेब तर चित्रपटात डॉ. अमोल कोल्हे, सिया पाटील, डॉ. शरद भुताडीया, माधव अभ्यंकर, समीर विजय, संजय कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी, शशांक शेंडे आणि गणेश यादव यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. चित्रपटाची कथा- पटकथा- संवाद शिव कदम यांची असून कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी आदि रामचंद्र हे सांभाळीत आहेत.

'जागरण' मधील अर्थपूर्ण गीते शिव कदम, प्रसन्न देशमुख यांनी लिहीली असून त्यांना आदि रामचंद्र यांनी संगीतबद्ध केले आहे. तर ही गाणी सुप्रसिद्ध गायक हरिहरन, सुरेश वाडकर, वैशाली सामंत आणि आदि रामचंद्र यांनी गायली आहेत.

  

Tags: अरविंद तावरे, मुक्ती व्हिज्युअल्स, समीर रावसाहेब, डॉ. अमोल कोल्हे, सिया पाटील, डॉ. शरद भुताडीया, माधव अभ्यंकर, समीर विजय, संजय कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी, शशांक शेंडे, गणेश यादव, शिव कदम, आदि रामचंद्र, जागरण, प्रसन्न देशमुख, गायक हरिहरन, सुरेश वाडकर, वैशाली सामंत



 




मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2011. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.

-: A Project by :-
Honeybee Media
Honeybee Media Pvt. Ltd.