मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टेलिव्हिजन यांची माहिती देणारं अग्रगण्य मराठी संकेतस्थळ. | Change Language: English  | Saturday, December 20, 2014
मुख्य पृष्ठ - संपर्क | facebook twitter RSS Updates 
marathimovieworld  
मुख्यपृष्ठ सिनेवार्ता परीक्षण मुलाखत
सिनेवार्ता
'आनंदमूर्ती' ऑडीओ सीडीचे प्रकाशन आणि सामाजिक ट्रस्टची निर्मिती.
बुधवार, १२ सप्टेंबर २०१२| © मराठीमुव्हीवर्ल्ड
Anandmurti Audio Album आपल्या आईच्या स्मरणार्थ एका भक्तीगीताच्या अल्बम सोबतच सामाजिक आणि शैक्षणिक कार्यासाठी धर्मादाय संस्थेची स्थापना करून एक नवा आदर्श निर्माण करणारा सोहळा नुकताच जुहू स्कीम पार्ले येथील प्रसिद्ध भाईदास सभागृहात समस्त बुरांडे कुटुंबीयांनी आयोजित कार्यक्रमात पहायला मिळाला. या प्रसंगी स्वरचंद्रिका पद्मश्री पद्मजा फेणाणी - जोगळेकर यांच्या अलौकिक रचनांनी सजलेल्या 'आनंदमूर्ती' या ऑडिओ सीडीचे प्रकाशन भजनसम्राट अनुप जलोटा यांच्या शुभहस्ते आणि खासदार एकनाथ गायकवाड, माजी नगरपाल जगन्नाथ हेगडेवार, कोळी समाजाचे नेते नामदेव भगत, भजन सम्राट महादेवबुवा शहाबाजकर, गायिका पद्मजा फेणाणी- जोगळेकर, विलास बुरांडे, तुलसी बुरांडे, आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. 

सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी - जोगळेकर यांच्यासोबत मंदार पारखी आणि मनोज देसाई यांनी 'आनंदमूर्ती' ह्या ऑडिओ सीडीतील भक्तिगीतांच्या रचनांसाठी योगदान दिले आहे. 
मुख्यपृष्ठ
I आमच्याविषयी काही I संपर्क I डिस्क्लेमर I प्रायव्हसी पॉलिसी I टर्म्स ऑफ युस I प्रतिक्रिया I जॉब्स
ह्या वेबसाईट संदर्भात मित्रांना सांगा I ऍड टु फेव्हरेटI मेक दिस होमपेज
Marathimovieworld.com support the cause of anti piracy in the music industry.
Marathimovieworld.com do not provide audio downloads or play mp3 music files on this site.
© 2007 - 2013. www.marathimovieworld.com . All Rights Reserved.