| मराठी संगीत सृष्टीतील एक
प्रसिद्ध आणि यशस्वी नाव. ज्याने आपल्या आवाजाने प्रत्येक संगीतप्रेमीच्या
मनावर छाप पाडली आहे. ज्याची 'राधा ही बावरी' आणि 'गालावर खळी' आजही
गुणगुणली जाते. त्याच्या प्रवासाबद्दल त्याच्याशी मारलेल्या गप्पा.... |
 |
* सध्या तू 'ई टिव्ही' वरील एका रिऍलिटी शो 'गौरव
महाराष्ट्राचा'चा परीक्षक आहेस. पण रिऍलिटी शो बद्दल तुझ काय मत आहे?
- 'गौरव महाराष्ट्राचा' हा शो परिक्षकांचा आहे. जी जाण
परीक्षकांना असते ती श्रोत्यांना असतेच असं नाही. यामुळे अयोग्य व्यक्ती हा
पुरस्कार जिंकू शकते. पण परीक्षकांनाच सर्व अधिकार असल्याने किमान या
शोमध्ये तरी टॅलेन्टला महत्त्व दिले जाते. म्हणून या शो ला आपण रिऍलिटी शो
पेक्षा आपण टॅलेन्ट शो म्हणायला काही हरकत नाही.
* आजच्या पिढीतल्या टॅलेन्ट बद्दल तुला काय वाटतं?
- आजची पिढी खूप टॅलेन्ट आहे. पण त्यांना आधीच्या लोकांसारखं
dedication देता येत नाही. आपल्या आधीच्या पिढीतल्या लोकांकडे प्रत्येक
गोष्टीसाठी पुरेसा वेळ असायचा. हल्ली multitasking चा जमाना
|
|
असल्यामुळे थोडा
फरक पडतो. Generation gap जरी असला तरी ती शिदोरी पकडूनच प्रवास करायचा
आहे. ही पिढी फार creative आहे.
* तू कशाला जास्त महत्त्व देशील? Talent की
performance ला?
- मी नक्कीच Talent ला महत्त्व देईन . कारण एका चांगल्या
performer चा तोच पाया आहे. तुमच गाणं लोकांना ऐकावसं वाटतं म्हणून ते शो
ला येतात. आणि आज काल जर तुम्ही गाण्याबरोबर चांगल perform ही करत असाल तर
ते प्रेक्षकांना भावत. गाणं हे जस श्रवणीय आहे तसचं ते प्रेक्षणीय झालं तर
जास्त मजा येते. गाणार्याला पणं आणि ऐकणार्यालापण. performance ही एक
add value आहे. जी सध्याच्या काळात असायलाच हवी. If u have talent u will
be a good performer.
* तुझ्या यशाचे श्रेय तू कुणाला देशील?
- मी माझ्या यशाचे श्रेय सर्वप्रथम माझे गुरू सुरेशजी वाडकर यांना
देऊ इच्छितो. तसेच अशोक पत्की यांना सुद्धा. शिवाय मी आतापर्यंत ज्यांच्या
सोबत काम केलयं अशा सर्व composers, lyrics writers, वाद्यवृंद, माझ्या एका
गाण्यामागे कार्यरत असलेल्या संपूर्ण टिमला मी माझ्या यशाचे श्रेय देतो.
* अजय- -अतुल सोबत असलेल्या तुझ्या tuning बद्दल काय सांगशील?
- अजय- अतुल हे माझे मित्रच आहेत. त्यांच्याबरोबर काम करायचा
वेगळाच आनंद असतो. आम्ही आजच्या पिढीला, आजच्या संगीताला represent करतो ते
लोकांना जास्त भावतं. त्यामुळेच माझ्या अजय- अतुल सोबतच्या पहिल्या 'बेधुंद'
या अल्बम मधली गाणी आजही लोकांच्या लक्षात व ओठांवर आहेत.
* संगीत या क्षेत्रात तुझ आतापर्यंत काय योगदान आहे? तुला स्वतःला
कोणत्या प्रकारचं संगीत आवडतं? संगीताव्यतिरीक्त तुला काय करायला आवडते?
- मी काही मराठी मालिकांसाठी शिर्षकगीत compose केली आहेत. मला
सर्व प्रकारचे संगीत आवडते. मुळात melody हा संगीताचा आत्मा आहे. आणि ज्या
ज्या गाण्यामध्ये melody आहे ती सर्व गाणी मला आवडतात. गाण्याव्यतिरीक्त
मला फिरायला खूप आवडतं वेगवेगळे प्रदेश पहायला आवडतं. I'm also passionate
about sports तसेच I like putdoor, indoor games. मला जिम मध्ये जायला आवडतं
कारण Fitness is important.
त्याव्यतिरीक्त राजेंद्र तालक यांच्या 'सावली' या मराठी सिनेमात मी काम केल
आहे. कारण त्यातला माझा रोल हा माझ्या proffession शी मिळता जुळता होता.
कदाचित त्यामुळेच मी ती भूमिका चांगली निभवू शकलो असेन. But it was tatally
experiment. मला फक्त पहायचं होतं कि अभिनय हा प्रकार मला कितपत पेलवू शकतो.
* म्हणजे तुला भविष्यात पडद्यावर पहायला मिळू शकते?
- हो नक्कीच. जर 'सावली' सारखी एखादी चांगली कथा आणि मला पेलवणारी
भूमिका असेल तर नक्कीच मी चित्रपटात काम करेन.
* एखाद्या संगीतकाराबरोबर काम करायची इच्छा किंवा एखाद्या नायकासाठी
पार्श्वगायन करायची इच्छा जी अजून पूर्ण झाली नाही?
- नाही. तसं काही नाही. मी आजपर्यंत ज्यांच्या बरोबर काम केले ते
सगळेच इतर legend इतकीच talented आहेत. मी मला आतापर्यंत मिळालेल्या
संधीबद्दल खूप समाधानी आहे. माझ्या मनात असं बिल्कुल नाही की मला एका
विशिष्ट व्यक्तीसोबत काम करायच आहे किंवा राहून गेलं.
* हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन करायचा काही विचार आहे का?
- हिंदी चित्रपटासाठी पार्श्वगायन करायची इच्छा तर नक्कीच आहे जर मला तशी
संधी मिळाली तर मी नक्कीच तिचा उपयोग करेन.
|